1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम


2022 ला कतार येथे फुटबॉल विश्वचषक पार पडणार आहे. विश्वचषकादरम्यान 3 शहरातील 8 स्टेडिअममध्ये सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये कतारची राजधानी दोहामध्ये बनत असलेल्या रस अबु अबुद स्टेडियमचा देखील समावेश आहे. या स्टेडियमची खास गोष्ट म्हणजे हे स्टेडियम 1000 कंटेनर वापरून बनवण्यात येत आहे. यासाठी चीनवरून पहिल्या टप्प्यात 90 कंटेनर पाठवण्यात आले आहेत.

या स्टेडियमची आणखी एक खास गोष्ट म्हणजे विश्वचषकानंतर हे स्टेडियम तोडण्यात येणार आहे. फिफाचे हे पहिलेच असे स्टेडियम असेल जे री-युजेबल आहे. स्टेडियम तोडून हे कंटेनर पुन्हा दुसऱ्या देशात स्टेडियम बनवण्यासाठी पाठवले जाणार आहेत. अबुद या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची बसण्याची क्षमता 40 हजार असेल. हे स्टेडियम 2020 मध्ये बनवून तयार असेल.

विश्वचषकाच्या एका पदाधिकाऱ्यानुसार,स्टेडियम बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू पुन्हा वापरण्यात येणार आहेत. कंटेनर पोर्टवर उतरल्यानंतर ते स्थिर ठेवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात सामान भरले जाते. त्यानंतर त्यांचा वापर स्टेडियम बनवण्यासाठी केला जातो. बिल्डिंग बॉक्सच्या आकाराचे कंटेनरमध्ये स्टेडियमचे बाथरूम, ऑफिस आणि गेस्ट रूम बनवले जातील. बिल्डर्ससाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनवल्यानंतर हे कंटेनर्स एका जागी स्थिर राहणे गरजेचे आहे. याआधी कतारने विश्वचषकासाठी तीन स्टेडियम तयार केले आहेत. आणखी 5 स्टेडियमचे काम सध्या सुरू आहे. लुसैल शहरातील आयकॉनिक स्टेडिअम प्रेक्षकांच्या क्षमतेनुसार सर्वात मोठे स्टेडियम असेल. येथे एकाचवेळी 80 हजार प्रेक्षक सामना बघू शकतील.

The post 1000 कंटेनरपासून कतारमध्ये बनवण्यात येत आहे फुटबॉल विश्वचषकासाठी स्टेडियम appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *