1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी


मुंबई : जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे निर्णय घेतल्यामुळे कराचे ओझे थोडे का होईना पण कमी झाले आहे. तर काही गोष्टींवरचा कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून काही वस्तू स्वस्त होणार तर काही महाग होणार आहेत.

त्यानुसार आता हॉटेलमध्ये 1000 रुपयांपर्यंतच्या रुमला कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. त्याचबरोबर 7500 रुपयापर्यंतच्या रुमला आता फक्त 12 टक्के जीएसटी द्यावा लागेल. अशा प्रकारे 7500 रुपयांहून जास्त दर असलेल्या रुमसाठी जीएसटी 18 टक्के आहे. याआधी हॉटेल रुमसाठी हा GST 28 टक्के होता. जीएसटीचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

जीएसटी काउन्सिलने 28 टक्के जीएसटीमध्ये येणारी 10 ते 13 सीट्सचे पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवरचा सेस कमी केला आहे. 1200 सीसीच्या पेट्रोल वाहनांवरच्या सेसचा दर 1 टक्के आणि 1500 सीसीच्या डिझेल वाहनांवर 3 टक्के कर केला आहे. दोन्ही प्रकारच्या वाहनांवर सेस 15 टक्के आहे. तर जीएसटीवर 28 टक्के आहे.

सुक्या मिरच्यांवरचा जीएसटी शून्य झाला असून याआधी तो 5 टक्के होता. काउन्सिलने स्लाइड फास्टनर्सवर जीएसटी 18 हून 12 टक्के केला आहे. समुद्र नौकेला लागणारे इंधन, ग्राइंडर, हिरा, रुबी, पन्ना किंवा नीलम सोडून इतर रत्नांवरचा कर कमी केला आहे. भारताबाहेर तयार होणाऱ्या काही संरक्षण उत्पादनांवरचा जीएसटी कमी केला आहे.

त्याचबरोबर ट्रेनचे डब्बे बनवण्यावरचा 5 टक्के असलेला जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. तसेच कॅफिनवाले पदार्थांवर 18 टक्क्यांऐवजी 28 टक्के जीएसटी लावला आहे.

कॉर्पोरेट टॅक्समधील कपात नव्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांसाठी देखील लागू होणार आहे. जर कंपनीने अन्य कोणतीही सवलत घेतली नसेल तर त्यांना केवळ 22 टक्के टॅक्स द्यावा लागेल. सरचार्जसह एकूण टॅक्स 22.17 टक्के एवढा असेल. ही तरतूद 2019-20 या आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे. ऑक्टोबर 2019 नंतर नोंदणी झालेल्या कंपन्यांना 15 टक्के कर द्यावा लागले. सरचार्जसह हा टॅक्स 17.01 टक्के असेल. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे सरकारला 1.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

The post 1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *