हे आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 सीईओ


अनेक उद्योगपतींची संपत्ती ही जगातील अनेक लहान देशांच्या जीडीपी एवढी आहे. जग जसजसे दिवसेंदिवस बदलत चालले आहे, तसतसे काही मोजकेच उद्योगधंदे देखील वाढत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सीईओंच्या संपत्ती आणि पगारामध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. अशाच जगातील सर्वाधिक पगार असणाऱ्या सीईओंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जेफ बेझॉस
या यादीत पहिल्या स्थानावर जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि अँमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस हे आहेत. तांत्रिक दृष्ट्या जेफ बेझॉस यांचा पगार 81,840 डॉलर एवढा असला तरी देखील वर्षाला ते 78.5 बिलियन डॉलर एवढी रक्कम घेत असल्याचे सांगितले जाते. कारण अँमेझॉन कंपनीचे 16 टक्के शेअर त्यांच्या नावावर आहेत. याचबरोबर इतर जणांच्या तुलनेत बेझॉस हे खूप कमी खर्च करतात. आजही ते होंडा एकॉर्ड ही गाडी वापरतात. अँमेझॉनचे साम्राज्य बेझॉस यांनी एका छोट्या गँरेजपासून सुरू केले होते.

मार्क झुकेरबर्ग –
आजच्या काळात फेसबूक हे जगभरात सोशल मीडिया सेंसेशन समजले जाते. फेसबूकचे संस्थापक असणाऱ्या मार्क झुकरबर्गचा पगार हा केवळ 1 डॉलर एवढा आहे. मात्र कंपनीमधील शेअर, सीईओला असणाऱ्या सर्व सुविधा यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. झुकरबर्गच्या बँक खात्यात दरवर्षी 9 बिलियन डॉलर जमा होतात. मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चँन लाखो डॉलर हे संशोधन आणि शिक्षणावर खर्च करतात.

एलॉन मस्क –
एलॉन मस्क हे केवळ टेस्लासाठी ओळखले जात नसून, ते पे पल आणि स्पेस एक्सचे देखील संस्थापक आहेत. इतर सीईओप्रमाणेच तांत्रिक दृष्ट्या त्यांना कमी पगार असला तरी देखील सीईओ आणि कंपनीवरील ताबा यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांच्या संपत्ती दरवर्षी वाढ होत असून, त्यांची संपत्ती तब्बल 20 बिलियन डॉलर एवढी आहे.

ब्रेंडन कँनेडी  –
ब्रेंडन कँनेडी हे कँनबीस कंपनी ट्रीलचे संस्थापक आहे. ही एक औषधीय भांग बनवणारी कंपनी आहे. ब्रेंडन कँनेडी यांची कंपनी ही पहिली कँनेडियन कंपनी आहे जी अमेरिकत भांगापासून बनवलेली औषध विक्री करते. आपल्या कंपनीत कँनेडी ही आजही जोमाने काम करतात व अनेक नवनवीन वैद्यकिय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. आपल्या रिकाम्यावेळे पैसे खर्च करण्याऐवजी कँनेडी मुलांसाठी मस्त केक बनवत असतात.

बॉब इगर –
डिझनी मुव्हिजचे सध्याचे सीईओ हे बॉब इगर आहेत. त्यांच्या अंतर्गत मार्वेल इंटरटेंनमेंट, लुक्स फिल्म, 20 सेंच्युरी फॉक्स अशा अनेक कंपन्या येतात. तांत्रिक दृष्ट्याच त्यांचा वर्षाचा पगार हा 65 मिलियन डॉलर एवढा आहे. मात्र इतर फायदे मिळून त्यांची कमाई 140 मिलियन डॉलर एवढी आहे. तसेच अनेक ठिकाणी ते गुंतवणूक देखील करतात.

टीम कूक –
टीम कूक हे सध्या अँपल कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचा पगार 15 मिलियन डॉलर एवढा असून, त्याचबरोबर इतर फायदे आणि शेअरमुळे ते दरवर्षी 141 मिलियन डॉलर एवढी कमाई करतात. कूक अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत देखील करत असतात.

डेव्हिड झॅस्लॉव –
डेव्हिड झँस्लॉव हे डिस्कवरी चँनलचे सीईओ आहेत. याच कंपनीचे अँनिमल प्लँनेट, सायन्स चँनेल आणि फूड नेटवर्क इत्यादी चँनेल देखील आहेत. डेव्हिड झँस्लॉव यांची कमाई 2018 मध्ये 122 मिलियन डॉलर एवढी होती.

जेम्स हॅप्लेमन –
पीटीसी या सॉफ्टवेअर कंपनीचे जेम्स हॅप्लेमन सीईओ आहेत. ते दरवर्षी 70 मिलियन डॉलरची कमाई करतात. याचबरोबर सीईओ असण्याच्या सवलती व शेअरचा देखील त्यांना फायदा होता. जेम्स हे संपत्ती 121 मिलियन डॉलरचे मालक आहेत.

स्टिफन स्चॅवर्झन –
स्टिफन स्टॅवर्झन हे ब्लँकस्टोन ग्रुपचे संस्थापक सीईओ आहेत. त्याचबरोबर ते अनेक कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक करत असतात. स्टॅवर्झन यांची कमाई दरवर्षी 70 मिलियन डॉलर आहे. मात्र इतर सवलती व शेअर यामुळे ते 785 मिलियन डॉलरची कमाई करतात. तसेच ते मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी मदत देखील करतात.

स्टिफन एंजेल –
स्टेफन एंजेल हे जगातील सर्वात मोठी गँस कंपनी लिंडे पीएलसीचे सीईओ आहेत. त्यांना हे क्षेत्रातील तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे. स्टिफन यांची 2019 मध्ये संपत्ती 149 मिलियन डॉलर एवढी होती.

The post हे आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 सीईओ appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *