व्हिडिओ; महानायकांनी देखील केले जीव वाचणाऱ्या कुत्र्याचे कौतूक


माणसापेक्षा कुत्रा हा कितीतरी पटीने इमानदार आणि प्रामाणिक असतो, हे आपल्यापैकी अनेकांनी मान्य केलेच आहे. जनावरांमध्ये कुत्रा हा सर्वाधिक समजदार प्राणी समजला जातो. कारण आपल्या मालकाची कुत्रा हा नेहमीच रक्षा करतो. एक अशी घटना घडली की ती पाहून तुम्ही देखील कुत्र्याच्या शूरपणाचे कौतुक कराल. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. एक जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा या व्हिडिओमध्ये हा एका तरुणीला वाचविण्यासाठी थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. त्याचबरोबर त्याने आपल्या शक्कल लढवत तरुणीचा जीवही वाचवतो.

आपण सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकत की जेव्हा तरुणी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचे कुत्र्याने पाहिले तशी त्याने थेट पूलमध्येच उडी घेतल्यानंतर तरुणीच्या केसाला तोंडात पकडून या कुत्र्याने तिला खेचत खेचत पूलच्या बाहेर आणले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय वेगाने व्हायरल होता आहे.


आपण व्हिडिओ पाहून या बहादूर कुत्र्यांचे नक्कीच कौतुक कराल. व्हिडिओतील या कुत्र्याने स्पष्ट केले आहे की, त्याला आपल्या मालकाविषयी किती प्रेम आहे. कारण कुत्र्याने तरुणीचा जीव वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतल्यामुळे हा व्हिडिओ आता अनेक जण पसंत करत आहेत.


अँड्रयू अल्बर्ट नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी या कुत्र्याचे अमिताभ बच्चन यांनी देखील कौतुक केले आहे. आतापर्यंत १.५३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या २५ सेकंदाच्या व्हिडिओला पाहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९.८ हजार एवढे लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांकडून आता शेअर केला जात आहे. ज्या प्रकारे तरुणीला बुडण्यापासून कुत्र्याने वाचवले आहे ते पाहून तुम्ही देखील थक्क होऊन जाल.

The post व्हिडिओ; महानायकांनी देखील केले जीव वाचणाऱ्या कुत्र्याचे कौतूक appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *