विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला ‘जेमिनी मॅन’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


येत्या ११ ऑक्टोबरला भारतासह जगभरात हॉलिवूडचा ‘जेमिनी मॅन’ हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट विल स्मिथच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.


विल स्मिथ हा ‘जेमिनी मॅन’ या चित्रपटात हेन्री ब्रॉगन ही व्यक्तीरेखा साकारत असून एक खतरनाक खुनी तो आहे, त्याचा शोध एक रहस्यमय तरुण घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. जगभरातील प्रेक्षकांनी त्याला चांगली पंसती दिली होती.

अॅकॅडमी अवॉर्ड जिंकणारा चित्रपट निर्माता आंग ली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर निर्मिती प्रख्यात निर्माते जेरी ब्रूकहीमर, डेव्हिड एलिसन, डाना गोल्डबर्ग आणि डॉन ग्रेंजर यांनी केली आहे. विल स्मिथसोबतच या चित्रपटात मेरी एलिझाबेथ विन्स्टेड, क्लाईव्ह ओवेन आणि बेनेडिक्ट वोंग हे देखील झळकणार आहेत. 11 ऑक्टोबर 2019 रोजी भारतात ‘जेमिनी मॅन’ हिंदी, तामिळ, तेलुगु आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे.

The post विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला ‘जेमिनी मॅन’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *