युएई करणार मोदींचा ‘ऑर्डर ऑफ जायद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान


अबूधाबी – पंतपधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौरा आटोपल्यानंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये (दुबई) दाखल झाले असून आज पंतप्रधान मोदी क्रॉऊन प्रिंन्स शेख मोहम्मद बिन जायद यांची अबूधाबीमध्ये भेट घेणार आहेत. यावेळी ‘ऑर्डर ऑफ जायद’ या युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित केले जाणार आहे. दोन्ही नेते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

पाकिस्तान मुस्लीम राष्ट्रांचा काश्मीरप्रश्नी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच युएईचा सर्वोच्च सन्मान मोदींना मिळत असल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. भारताने काश्मीरप्रश्नी घेतलेला निर्णय चुकीचा नसल्याचे युएईचे भारतातील दूतावास अहमद अल बन्ना यांनी म्हटले आहे. तसेच भारताचा काश्मीर हा अंतर्गत मुद्दा असल्याचेही युएईने मान्य केले आहे. भारताने काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय देशातील प्रादेशिक असमानता संपवण्यासाठी घतला आहे. त्यात विशेष असे काही नाही, असेही बन्ना यांनी म्हटले आहे.

द्विपक्षीय मुद्द्यांवर देखील क्रॉऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद आणि मोदी चर्चा करणार आहेत. मोदींना सर्वोच्च सन्मान दोन्ही देशांमधील संबध वृद्धींगत करण्यासाठी देणार असल्याचे युइईने एप्रिलमध्ये जाहीर केले होते. युएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान यांच्या नावे हा सन्मान दिला जातो. त्यांची यावर्षी १०० वी जयंती आहे.

दोन्ही देशांचे नेते महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने एक टपाल टिकिट जारी करणार आहेत. तसेच कॅशलेस सेवेसाठी रुपे कार्डचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा युएई दौरा आहे. युएईला पोहचल्यानंतर मोदींनी खलीज टाईम्सला मुलाखत दिली.

६० बिलियन डॉलरवर भारत आणि युएईमधील व्यापार पोहचला आहे. भारताचा युएई हा तिसरा सर्वात मोठी व्यापारातील भागीदार देश आहे. तसेच युएईचा भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये चौथा क्रमांक लागतो. ३३ लाख भारतीय युएईमध्ये नागरिक राहत असल्यामुळेही भारत आणि युएईमध्ये मैत्रीपूर्ण संबध आहेत.

The post युएई करणार मोदींचा ‘ऑर्डर ऑफ जायद’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *