या माणसाकडे आहेत तब्बल १४९७ क्रेडीट कार्ड्स


आणीबाणीच्या वेळी किंवा रोख रकमेचा वापर नको म्हणून क्रेडीट कार्ड उपयुक्त ठरतात. क्रेडीट कार्ड युजरसाठी काही नियम जरूर असतात पण तुम्हाला किती क्रेडीट आहे यावर तुमची पत जोखता येते. क्रेडीट कार्डवर खरेदी केली तर ते पैसे वेळेत भरणे आवश्यक असते. एका व्यक्तीच्या क्रेडीट कार्ड बद्दल वाचून तुम्ही नक्कीच तोंडात बोट घालाल. वॉल्टर केव्हान्ग असे या माणसाचे नाव असून त्याच्याकडे १४९७ क्रेडीट कार्ड आहेत. गिनीज बुक मध्ये त्याचे नाव लाँगेस्ट वॉलेट साठी नोंदले गेले असून १९७१ पासून त्याचे नाव गिनीज बुक मध्ये कायम राहिले आहे.

वॉल्टरकडे असलेया १४९७ क्रेडीट कार्डपैकी ८०० त्याच्या वापरात आहेत आणि त्याला १० लाख डॉलर्स खर्च करण्याची त्यावर सवलत आहे. वॉल्टरच्या क्रेडीट कार्ड जमा करण्याची सुरवात १९६० मध्ये एका पैजेतून झाली. त्यावेळी तो विद्यार्थी होता आणि अशी पैज लागली जो एक वर्षात सर्वाधिक क्रेडीट कार्ड घेईल त्याला एक डिनर मोफत मिळेल. त्या वर्षात वॉल्टरने १४३ क्रेडीट कार्ड घेतली आणि पैज जिंकली. यातील एक वगळता सर्व कार्ड त्याने वापरली होती. ज्या कारणासाठी वॉल्टरच्या नावाची गिनीज बुक मध्ये नोंद झाली ते त्याचे वॉलेट २५० फुट लांबीचे आहे.

वॉल्टरला त्याच्या या शौकामुळे मि,. प्लास्टिक फँटास्टिक असेही नाव मिळाले आहे. त्याच्याकडे पेट्रोल पंप, एअरलाईन्स, बार, रेस्टॉरंट इतकेच काय पण टेक्सास आईसक्रीम स्टोरचे क्रेडीट कार्डही आहे. त्यात सर्वाधिक लोएस्ट ५० डॉलर्स क्रेडीटचे आहे.

वॉल्टरकडे काही अँटिक कार्डही आहेत. त्याच्याकडच्या क्रेडीट कार्डवरून क्रेडीट कार्डचा पेपर कार्ड पासून अल्युमिनियम कार्ड ते आजचे कॉमन प्लास्टिक कार्ड असा प्रवास पाहता येतो. विशेष म्हणजे त्याला क्रेडीट कार्ड नाकारणारी एकमेव कंपनी आहे जे.जे. न्युजबेरी. या कंपनीने वॉल्टरला ७० साली त्याच्याकडे अगोदरच खूप कार्ड्स असल्याने त्याचे क्रेडीट कार्ड नाकारले होते.

The post या माणसाकडे आहेत तब्बल १४९७ क्रेडीट कार्ड्स appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *