या दिवशी रिलीज होणार ‘सैरा’चा टीझर


एकाच चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार पाहण्याची अनोखी पर्वणी सिने रसिकांना मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे सैरा नरसिम्हा रेड्डी असे नाव आहे. ज्याची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत त्या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २० तारखेला येणार आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकाची सत्यकथा सैरा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून या चित्रपटाचा राम चरण निर्माता आहे. हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

The post या दिवशी रिलीज होणार ‘सैरा’चा टीझर appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *