या कंपन्यांच्या दुचाकीवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट


ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील मंदीचा फटका दुचाकीवाहनांना देखील बसला आहे. त्यामुळे वाहनांच्या विक्रीसाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑफर्स देत आहेत. फेस्टिव सीझनमध्ये वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या चांगल्या ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया कोणत्या कंपन्याच्या कोणत्या दुचाकीवर ऑफर्स आहेत.

बजाज – बजाजच्या अनेक बाईक्सवर 6 हजार रूपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 5 फ्री सर्विसिंग आणि 5 वर्षांची फ्री वॉरंटी मिळत आहे. ही ऑफर सीटी100 ते बजाज प्लॅटिना, पल्सर रेंज आणि डोमिनर 400 वर आहे. याचबरोबर कंपनीची एव्हेंजर रेंज, बजाज वी आणि बजाज डिस्कवर सीरिजवर देखील ऑफर्स आहेत. या ऑफर्स 31 ऑक्टोंबरपर्यंत आहेत.

यामाहा – यामाहाने देशभरात अनेक स्कीमची घोषणा केली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये स्कूटर खरेदी करणाऱ्यांकडे दोन पर्याय आहेत. या पहिल्या पर्यायात 0 टक्के व्याज दर आणि दुसरा फायनेंस अमाउंटवर 6.9 टक्के व्याजदराबरोबरच 3,999 रूपये डाउनपेमेंट हा पर्याय आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या ऑफरमुळे 8 हजारापर्यंतची बचत होईल. पुर्व भारतात कंपनी 6.9 टक्के व्याजदराबरोबरच कमी डाउनपेमेंट हा पर्याय देत आहे. तर पश्मिच भारतात कोणत्याही स्कूटर खरेदीवर कंपनी 4 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे नाणे देत आहे.

बाईक्सबद्दल सांगायचे तर FZ FI आणि FZ-S FI वर 6.9 टक्के व्याजदरालक 4,999 रुपये डाउनपेमेंट ही ऑफर आहे. ही ऑफर देशभरात लागू आहे.

सुझुकी – जर तुम्ही सुझुकी पेटीएमच्या माध्यमातून खरेदी केली तर तुम्हाला 8,500 रूपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळेल. याचबरोबर 777 रूपये डाउन पेमेंटचा पर्याय देखील आहे. तसेच, सुझुकीची कोणतीही स्कूटर खरेदी केल्यावर लकी ड्रॉमध्ये जिंकणाऱ्याला मारूती सुझुकी आणि 5 ग्रॅम पर्यंतचे सोने मिळेल. सुझुकीच्या दुचाकीवरील ऑफर्स 30 सप्टेंबरपर्यंत आहेत.

 

The post या कंपन्यांच्या दुचाकीवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *