मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद करत असल्याची सूचना परदेशी गुप्तचर संस्थेकडून भारतीय गुप्तचर संस्थेला दिली गेली आहे असे समजते. जैशचा दहशतवादी समशेर वाणी आणि त्याचा एक सहकारी याच्यात होत असलेले संभाषण या परदेशी गुप्तचर संस्थेने पकडले असून त्याची माहिती भारताला दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविले गेल्यापासून भारतावर मोठा हल्ला करण्यासाठी पाक प्रयत्नशील आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सप्टेंबरमध्ये अश्या हल्ल्याची योजना असून जम्मू काश्मीर, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह ३० संवेदनशील शहरातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. पाकिस्तानी आयएसआयचा एक मेजर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना हल्ल्याचे प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान अजित दोभाल यांच्या सुरक्षेची तपासणी केली जात आहे. पाकिस्तानने उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर पाक हद्दीत घुसून केले गेलेले सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील दहशवादी तळांवर भारतीय वायू सेनेच्या विमानांनी केलेले बॉम्बहल्ले यामागे दोभाल यांची महत्वपूर्ण भूमिका होती त्यामुळे दोभाल दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच भारतीय लष्करने देशात घुसलेल्या जैशच्या दहशतवाद्यांचा निवडून खात्मा केल्याने या संघटनेची बदला घेण्याची भावना तीव्र झाली आहे. सीमापार दहशतवादी घुसाविण्याचे प्रयत्न त्यामुळे वाढले आहेत.

The post मोदी, दोभाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्यासाठी जैशची तयारी appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *