भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क


इतिहास रचत भारताची शटल क्वीन पीव्ही सिंधूने पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याची किमया साधली आहे. जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात सिंधूने एकतर्फी विजय मिळवला. ओकुहाराचा सिंधूने 21-7, 21-7ने पराभव केला.


तब्बल तीन वेळा विश्वविजेते पदाने हुलकावणी दिल्यानंतर तिने अखेरी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकण्याची किमया साधली आहे.


भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला खेळाडू बनली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जादीत सिंधू जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत येणारी एकमेव भारतीय आहे.


टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स हि या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सिंधू ही या यादीत एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. सेरेना विलियम्सची कमाई ही 29.2 मिलियन डॉलर म्हणजे 207 कोटी आहे. तर, सिंधू वर्षाला 5.5 मिलियन डॉलर म्हणजेच 38.9 कोटी कमवते.


जाहिरातीतून सेरेना 177 कोटी कमवते. तर भारताची स्टार बॅडमिंटनपटू सिंधू जाहिरातींमधून 35.4 कोटी कमवते. एवढेच नाही तर, बीडब्लूएफ वर्ल्ज टूर जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू सिंधू इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणारी खेळाडू आहे.


या यादीत अमेरिकेची एलेक्स मॉर्गन 41 कोटी कमाईसह 12व्य़ा स्थानावर आहे. सिंधू आणि मॉर्गन यांच्यात केवळ 2 कोटींचा फरक आहे.

The post भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *