नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्यूब आणि ट्विटर सारख्या सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणात एक्टिव असतात. सर्व सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आता ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या यादीत नरेंद्र मोदी हे 20 व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप-20 मध्ये पोहचणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय आहेत.

सोमवारी ट्विटर पंतप्रधान मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या 5 करोड झाली आहे. मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 1.4 करोड फॉलोअर्सने मागे आहेत. तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा हे पहिल्या स्थानावर असून, त्यांचे ट्विटरवर 10.8 करोड फॉलोअर्स आहेत.

सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या भारतीय नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दुसऱ्या स्थानावर आहेत. ट्विटरवर केजरीवाल यांचे 1 करोड 54 लाख फॉलोअर्स आहेत. तर एक करोड 52 लाख फॉलोअर्स सोबत अमित शाह तिसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत कॉग्रेसचे माजी अध्यक्ष पाचव्या स्थानावर आहेत, त्यांचे 1 करोड 6 लाख फॉलोअर्स आहेत.

The post नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील फॉलोअर्स 5 कोटींवर appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *