नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक


सध्या सुरू असलेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांना एक ह्रदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. टेनिसपटू राफेल नदालचा ऑटोग्राफ घेण्यासाठी स्टॅंडवर लोकांची गर्दी झाली होती. नदालकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी या गर्दीत एका छोटा फॅन देखील होता. मात्र त्या गर्दीत तो दबला गेला. गर्दीत दबला गेल्याने त्या छोट्या चाहत्याने रडायला सुरूवात केली. त्यानंतर राफेल नदालचे त्याच्याकडे लक्ष गेले.

त्या छोट्या चाहत्याला रडताना बघून नदालने देखील त्याला उचलून घेत गर्दीतून बाहेर काढले. त्या रडणाऱ्या चाहत्याला शांत करण्यासाठी त्याच्याशी गप्पा मारल्या व तो शांत झाल्यानंतर त्याच्याकडून कॅप घेत त्याला ऑटोग्राफ देखील दिला.


एटीपी टुरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, व्हॉट अ मॅन ! व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला असून, 10 हजार पेक्षा अधिक जणांनी लाइक केला आहे.


अनेक युजरनी या व्हिडीओवर कमेंट्स करत लिहिले की, या कारणामुळेच तो आम्हाला आवडतो. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, त्याचे मन खूप मोठे आहे.

The post नदालच्या या कृत्याचे नेटकरी करत आहेत कौतुक appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *