दुबई न्यायालयाने केली आंबे चोरणाऱ्या भारतीयाची घरवापसी


मागील वर्षी दुबईच्या विमानतळावर काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला आंबे चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात त्या आरोपीवरील आरोप सिध्द झाले असून, युएईच्या न्यायालयाने त्या भारतीय व्यक्तीला भारतात परत पाठवून देण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर त्याला दंडही ठोठवण्यात आला आहे.

27 वर्षीय व्यक्तीला 5 हजार दिरहम (96 हजार रूपये) दंड ठोठवण्यात आला आहे. या भारतीय व्यक्तीने ऑगस्ट 2017 मध्ये विमानतळावरून फ्रुट बॉक्समधून दोन आंबे चोरी केले होते. त्या आंब्यांची किंमत 6 दिरहम म्हणजेच जवळपास 105 रूपये होती.

आंबे चोरी करण्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. विमानतळावरील सिक्युरिटीने सीसीटिव्ही रॅकॉर्डिंगमध्ये पाहिले की, कर्मचारी भारतात जाणारा फ्रुट बॉक्स उघडत आहे. त्यानंतर तपासात त्याने आंबे चोरल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की, मला तहान लागली होती व मी पाणी शोधत होता, म्हणून मी बॅग उघडली होती.

न्यायालयाने आता या कर्मचाऱ्याला भारतात पाठवून देण्यास सांगितले आहे. आरोपीकडे न्यायालयाच्या या निर्णयाविरूध्द दाद मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आहे.

 

The post दुबई न्यायालयाने केली आंबे चोरणाऱ्या भारतीयाची घरवापसी appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *