डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन देखील घेणार एन्ट्री!


सध्याचे युग हे डिजीटल युग आहे ते आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यातच डिजीटल मीडियात दरदिवशी होणारे बदल देखील आपण अनुभवत आहात. तसेच या डिजीटल युगात अनेक कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. याच डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील लवकरच एन्ट्री होणार असल्याची सध्या चर्चा आहे. आपल्या सीरिजमध्ये त्यांना घेण्यासाठी अ‌ॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्समध्ये एका प्रकारे स्पर्धाच सुरु झाली आहे.

खुद्द अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आपल्याला एखाद्या चांगल्या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच करेन, असे ते म्हणाले होते. त्यांनंतर अ‌ॅमेझॉन प्राईमचे विजय सुब्रमण्यम आणि अपर्णा पुरोहित यांनी लगेचच अमिताभ बच्चन यांनी आपल्या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारावी, असे म्हटले आहे.

यापूर्वी अभिषेक बच्चनने अ‌ॅमेझॉन प्राईमसोबत काम केले असल्यामुळे आता अमिताभ यांच्यासोबतदेखील आम्हाला काम करण्याची संधी मिळावी, असेही ते म्हणाले. अ‌ॅमेझॉन प्राईमची लवकरच एक तरुणाईवर आधारित रि‌अ‌ॅलिटी शोची निर्मिती करणार आहे. ‘स्कल्स अँड रोझेस’, असे या शोचे नाव आहे. या शोचा प्रिमिअर ३० ऑगस्टला होईल.

The post डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन देखील घेणार एन्ट्री! appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *