क्रिकेट मैदानानंतर हार्दिक पांड्याचा फॅशन रँम्प वर जलवा


टीम इंडियाचा तडाखेबाज अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने क्रिकेट मैदानानंतर आता फॅशन जगतात रँप वॉक करून त्याचा जलवा दाखविला आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन विक २०१९ मध्ये हार्दिकने डिझायनर अमित अग्रवाल साठी रँपवॉक करून सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. त्याचा हा पहिलाच रँपवॉक असला तरी जबर आत्मविश्वासाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यश मिळविले आहे.

या रँपवॉकवर त्याच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री लिसा हेडन आणि डिझायनर अमित अग्रवाल होते. धुंवाधार फलंदाजीने मैदानावर क्रीडाप्रेमींचा चाहता बनलेला हार्दिक या नव्या मंचावर शो स्टॉपर ठरला. लॅक्मेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हार्दिकचे फोटो शेअर करताना सुंदर लिसासह करिष्माई हार्दिक असे कॅप्शन दिले आहे तर हार्दिकनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर रँपवॉकचे फोटो शेअर केले आहेत. मरून रंगाच्या अटायरमध्ये हार्दिक यात दिसत आहे.

सध्या टीम इंडिया वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे पण हार्दिकला विश्रांती दिली गेली आहे. मैदानाबाहेर हार्दिक अनेक उद्योगांमुळे चर्चेत असतोच. कॉफी वुईथ करन शो मध्ये वादग्रस्त विधाने करून तो चर्चेत आला होता आणि त्याला माफी मागण्याची वेळ आली होती. आत्तामात्र तो चांगल्या कारणासाठी चर्चेत आहे.

The post क्रिकेट मैदानानंतर हार्दिक पांड्याचा फॅशन रँम्प वर जलवा appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *