केटीएची बहुप्रतिक्षित बाईक 790 Duke भारतात लाँच


केटीएने बहुप्रतिक्षित स्पोर्ट-नेकेड बाईक 790 Duke भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रूपये आहे. ही बाईक बीएस4 इंजिन सोबत भारतात लाँच करण्यात आली असून, सध्या 100 युनिट बाइक अलॉट भारतात पाठवण्यात आले आहे.

 

(Source)

केटीएम 790 ड्यूक मध्ये शार्प स्टाइल फ्यूल टँक, एलईडी हेडलँम्प, स्प्लिट सीट्स आणि एलईडी टेललाइट देण्यात आली आहे. ही बाईक आंतरराष्ट्रीय बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे. यामध्ये  799cc, पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे 105hp पॉवर आणि 86Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स आहे.

(Source)

या बाईकमध्ये 43mm, नॉन-अजस्टेबल USD फोर्क आणि प्री-लोड मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच अन्य फिचर्सबद्दल सांगायचे तर यात फुल-टीएफटी डिस्प्ले, बॉश कॉर्नरिंग एबीएस, लीन-अँगल सेंसिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल आणि बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये 4 राइडिंग मोड आणि 17इंचचे अलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. समोर 300 mm ड्यूल डिस्क आणि रिअरमध्ये 240 सिंगल डिस्क ब्रेक आहे.

(Source)

केटीएम 790 ड्यूक सध्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे, कोलकाता, हैद्राबाद, सुरत, गुव्हाटी आणि चेन्नई मध्ये उपलब्ध आहे. एप्रिल 2020 पर्यंत अन्य 30 शहरात देखील उपलब्ध होईल

The post केटीएची बहुप्रतिक्षित बाईक 790 Duke भारतात लाँच appeared first on Majha Paper.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *